मराठमोळा पुष्पा! अल्लू अर्जुनच्या मराठी ट्रेलरचा सोशल मीडियावर बोलबाला, पाहा व्हिडीओ
मुंबई | सध्या मनोरंजन विश्वातून एकच आवाज घुमत असल्याचं दिसत आहे. तो म्हणजे, ‘पुष्पा, पुष्पराज…’. सध्या या आवाजानं आणि या चित्रपटानं सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातला आहे. सध्या सगळीकडे याचीच चर्चा पहायला मिळत आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा नवीन चित्रपट ‘पुष्पा’ चांगलाच हिट ठरला आहे. या चित्रपटानं अगदी चिमुकल्यांनाही वेड लावल्याचं पहायला मिळत आहे. यामधील गाणी, डायलाॅग, अभिनेता अल्लू अर्जुनची हटके स्टाईल, जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांचे मन जिंकून टाकले. यासोबतच नॅशनल क्रश असलेली अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या दिलखेचक अदांनी सगळ्यांना वेड लावून टाकलं आहे.
सगळीकडे पुष्पाची चर्चा असतानाच आता पुष्पाच्या मराठी वर्जननं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुष्पाचा मराठीमध्ये ट्रेलर डब करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खासरे युट्यूब चॅनेलनं डब केला आहे. लोकांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, मनोरंजन विश्वात ‘पुष्पा’ या चित्रपटानं चांगलाच गराळा घातला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा’ ची तुफान चर्चा पहायला मिळत आहे. खूप कमी वेळात जास्तीत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी पुष्पा हा एक आहे.
थोडक्यात बातम्या –
हाॅलिवूडला मोठा धक्का! Marvelच्या सिरिजमधील अभिनेत्याचा अपघाती मृत्यू
Tata Motorsच्या सर्वच गाड्यांच्या किंमतीत मोठे बदल, आत्ताच जाणून घ्या नव्या किंमती
निव्वळ आनंद! किरण माने यांना मिळाला नवा चित्रपट, साकारणार ‘ही’ भूमिका
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट, डाॅक्टर म्हणाले…
पुढील 2-3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा गंभीर इशारा
Comments are closed.