बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! मराठमोळ्या अभिनेत्रीची पुरग्रस्तांना तब्बल 10 कोटींची मदत

कोल्हापूर | राज्यात मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात सातारा, सागंली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरड दुर्घटनेमध्ये अनेक नागरिकांनी आपला प्राण जीव गमावला आहे. त्यासोबतच अनेकांच्या घरात-दुकानात पाणी आल्याने प्रचंड नुकसान झालं. पूर जसा ओसरला आहे तसतसं अनेक नेते आणि अभिनेते पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

दीपाली सय्यद यांनी भुरगड तालुक्यात जाऊन पाहणी केली आणि पूरग्रस्तांचे अश्रूही पुसले. त्यासोबतच त्यांनी 10 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. भयंकर आहे सगळं. जेव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. लोक धाय मोकलून रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले असून प्रत्येक घराघरात एकच चित्र असल्याचं दीपाली यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागात मोठं नुकसान झालं आहे. काहीच उरलं नाही. दोन वर्ष कोरोना महामारीत गेलंय. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघाताना भयानक वाटलं. देव किती परीक्षा घेणार? स्ट्राँग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या. कोरोना येतोय, पूर येतोय, अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली.

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत जाहीर केल्यामुळे त्यांचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे हादरलं! दत्ता फुगेंच्या मुलाच्या कानशिलात लगावल्याचा राग, तरुणाची हत्या

…म्हणून मी रुग्णालयात दाखल झालो होतो; जयंत पाटलांचं स्पष्टीकरण

पुढच्या निवडणुकीत मोदी विरूद्ध भारत असेल- ममता बॅनर्जी

राज्य सरकारचा मोठा निर्णय! खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात

‘धीर तरी कसा देऊ’; चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर असताना उर्मिला मातोंडकरांना पैसे देताना अश्रू अनावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More