बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ न्यूड फोटोमुळे राधिका आपटे सोशल मीडियावर ट्रोल!

मुंबई | मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे माहित नाही असं कोणीही आढळणार नाही, आपल्या अभिनयाच्या जोरावर राधिकाने आपलं एक स्वतंत्र अस्तित्व तयार केलं आहे. मात्र यासोबतच राधिका आपटे आपल्या वादग्रस्त गोष्टींमुळे कायमच चर्चेत रहात असते, आपल्या बिनधास्त वागण्या-बोलण्यामुळेही ती चर्चेत असते. सध्या राधिका भलत्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

राधिकाच्या दमदार अभिनयाचं आणि बोल्ड व्यक्तीमत्वाचं नेहमीच कौतुक होत असलेलं पाहायला मिळतं. मात्र सध्या ती तिच्या बोल्ड अंदाजामुळे ट्रोल होत आहे. राधिका पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आली असून ‘#BoycottRadhikaApte’ हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड करत असल्याचं पहायला मिळत आहे.

राधिकाच्या एका जुन्या चित्रपटातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिनं चित्रपटासाठी दिलेला न्यूड सीन या फोटोमधून पहायला मिळत आहे. तसेच व्हायरल होणारा हा फोटो लीना यादव दिग्दर्शित ‘पार्चेड’ चित्रपटातील आहे. सध्या या ट्रेंड होणाऱ्या हॅशटॅगमुळं राधिकाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, बाॅलिवूड भारतीय संस्कृतीचा नाश करत असल्याचं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. त्यामुळे या फोटोला ट्विट आणि रिट्विट केलं जात आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे राधिकाला चांगल्याचं अडचणींना सामोरं जावं लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

राज ठाकरेंचं ‘मिशन पुणे’; आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

‘वे डरते हैं…’; कविता ट्विट करत जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

अखेर 8 लाखांची लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीरला अटक!

“चंद्रकांत खैरे जळक्या वृत्तीचे, इम्तियाज जलील चंद्रकांत खैरेंपेक्षा चांगले खासदार”

‘राहुल गांधींना लोकसभेतून निलंबित करा’; रामदास आठवलेंची मोठी मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More