पुणे | मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाकडून आयोजित ‘ला जर्नालिस्ट’ हा महोत्सव उत्साहात पार पडला. आठवडाभर सुरू असलेल्या या महोत्सवाचा शनिवार 15 फेब्रुवारी रोजी समारोप झाला.
या महोत्सवांतर्गत मान्यवरांची व्याख्याने, फोटोग्राफी स्पर्धा, पोस्टर बनविणे स्पर्धा असे विविध उपक्रम विभागाकडून राबवण्यात आले.
व्याख्यानमालेमध्ये प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रसाद नामजोशी (चित्रपट दिग्दर्शन), विश्वनाथ गरुड (डिजीटल मीडिया), श्रीपाद ब्रह्मे(चित्रपट रसास्वाद), सुकीर्त गुमास्ते, उर्मिला निंबाळकर (ऑडिओ, व्हिडिओ ब्लॉगिंग), असीम सरोदे (नागरिकत्व आणि कायदे) यांची व्याख्याने पार पडली. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘यमक वगैरे’ समूहाकडून कविता आणि गीते यांचे सादरीकरण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या विविध उपक्रमांना भरभरून पाठिंबा दिला. या महोत्सवाकरता विभाग प्रमुख प्रा.संतोष शेणई, प्राध्यापिका नूतन काणेगावकर, स्वप्नजा मराठे यांनी मार्गदर्शन केलं.
ट्रेंडिंग बातम्या-
“दुसर्याला बावळट म्हणता आपला बावळटपणा सगळ्यांना दिसतोय”
वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते- छगन भुजबळ
महत्वाच्या बातम्या-
केंद्राने पैसे थकवल्यामुळेच राज्यापुढे अर्थिक अडचणी- सुप्रिया सुळे
आर. आर. आबा आणखी 20 वर्ष राजकारणात पाहिजे होते- इंदुरीकर महाराज
“तिघेही एकत्र अंगावर आले, निवडणूक लढले तरी भाजप त्यांना पुरून उरेल”
Comments are closed.