बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठवाड्याच्या निलेशची UPSC मध्ये गगनभरारी, सलग दुसऱ्यांदा मिळवलं यश

लातूर | प्रशासन म्हणजे आपल्या व्यवस्थेतील महत्वाचा भाग आहे. या प्रशासनात सहभागी होण्याचं स्वप्न देशातील लाखो विद्यार्थी पाहत असतात. देश पातळीवर युपीएससीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची भरती घेण्यात येत असते. युपीएससीनं नुकताच आपला निकाल जाहीर केला आहे. यात लातूरच्या निलेश गायकवाड यांनी 629 व्या क्रमांकान उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे.

निलेश गायकवाड या विद्यार्थ्यांने गतवर्षी सुद्धा युपीएससीमध्ये यश मिळवलं होतं. आपल्या अभ्यासाच्या जोरावर निलेश सलग दुसऱ्यांदा युपीएससीमध्ये उत्तीर्ण झाला आहे. निलेश हा मुळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहे. निलेश गायकवाडचे वडील लातूरच्या प्रतिष्ठीत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

निलेश गायकवाड याचं प्राथमिक शिक्षण लातुरात श्री केशवराज विद्यालयात झालं आहे. नंतर त्याचं माध्यमीक शिक्षण लातूरच्या देशिकेंद्र विद्यालयातून झालं आहे. उच्च शिक्षण आयआयटी मुंबई येथून बी.टेक आणि एम.टेक केमिकल फॅकल्टीमध्ये झालं आहे. खाजगी कंपनीत कामाला लागल्यानंतर कामात मन न रमल्यानं युपीएससी करण्याचा निर्णय घेतला आणि आपला निर्णय निलेशनं योग्य ठरवला आहे.

निलेश गायकवाड यांच्या या यशाने राज्यात लातूर पॅटर्नची चर्चा होत आहे. लहानपणापासूनच अंगात नेतृत्वगुण असणारा निलेश महाविद्यालयीन जीवनात जनरल सेक्रेटरी पदावर निवडून आला होता. आपल्या अंगातील याच नेतृत्व गुणांच्या बळावर निलेश आता प्रशासनात नेतृत्व करणार आहे.

थोडक्यात बातम्या 

…तरच जीएसटीच्या कक्षेत येणार पेट्रोल आणि डिझेल- निर्मला सितारामन

“पालकांनो तुमचा मुलगा मुलगी काय करते याकडे लक्ष द्या”

कोरोना कधी संपणार?; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

राजकारणात अशा घटनांमुळे चुकीचा पायंडा पडतोय, हे अत्यंत डिस्गस्टिंग आहे- पंकजा मुंडे

मोठी बातमी! आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली; विद्यार्थी संभ्रमात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More