बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MARD Doctor Strike: कोरोनाचं सावट घोंगावत असताना डाॅक्टरांचा आजपासून संप

मुंबई | महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसनं (Corona virus) पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) होणार का? याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचं टेंशन सुरु असतानाच आता राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे टेेंशनमध्ये आणखीनच वाढ झाली आहे.

महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट संघटनेचे (MARD Doctor Strike) डॉक्टर आज संपावर जाणार आहेत. जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट संघटनेच्या डॉक्टरांनी दिला आहे.

या संपामध्ये कोविड इन्सेन्टिव्ह आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उत्तम वसतिगृह सुविधा, पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे, अशा काही मागण्या केल्या आहेत. त्यामुळे पहिलेच कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना आता डाॅक्टरांनीही संप पुकारल्यामुळे चिंता वाढली आहे.

दरम्यान, आज सकाळी 11 वाजल्यापासून संप सुरू करणार आहेत. या संपात अनेक मागण्या केल्या गेल्या आहेत. मार्डचे सदस्य डॉ. अक्षय यादव यांनी म्हटलं की, आम्हाला आजा 11.30 वाजता उच्च अधिकाऱ्यांनी चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे. मात्र आम्हाला लेखी अश्वासन हवंय, जे अजूनही मिळालेलं नाही.

थोडक्यात बातम्या – 

गोव्यात राडा: ‘या’ स्टार खेळाडूच्या पुतळ्यावरुन नवा वाद

Corona: राज्यात नवीन नियमावली जाहीर, ‘हे’ असणार नवे नियम

“माझा जास्त वेळ जुन्या गोष्टी शोधून त्या दुरुस्त करण्यातच जात आहे”

“दात पाडीन” म्हणत शिवसेना नेत्याची महिला पदाधिकाऱ्यावर आरेरावी

मोठी बातमी! भाजप आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More