बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमरावतीकरांसाठी बाजारपेठा सुरू पण संचारबंदीचे ‘हे’ नियम मात्र कायम

अमरावती | त्रिपुरा येथील कथीत हिंसाचाराच्या घडनेचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले. पण अमरावती येथे मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर अमरावतीत कडक संचारबंदी लागू करण्यात आली. पण कडक संचारबंदीनंतर अमरावतीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती येथील संचारबंदीच्या नियमातून नागरिकांना मूभा देण्यात आली आहे.

अमरावती शहरात संचारबंदीच्या नियमांत शिथीलता देण्यात आली असून सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत बाजारपेठा उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अमरावती शहरात बाजारपेठा उघडल्या असल्या तरी रात्रीची संचारबंदी मात्र कायम ठेवण्यात आली. रात्री 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीच्या संचारबंदीचे नियम लागू असणार आहेत.

संचारबंदीमुळे शहरातील बाजापेठांना मोठा आर्थिक फटका बसला होता. पण आजपासून अमरावती शहरात सकाळी 7 वाजता बाजारपेठा खुल्या होणार असून त्या रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर या वेळात संचारबंदीच्या नियमांत पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पूर्वी दिलेल्या सवलतीदेखील कायम राहणार आहेत.

दरम्यान, अमरावती शहरात घडलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 55 गुन्हे दाखल केले असून 312 जणांना अटक देखील केली आहे. तर शहरातील वातावरण भडकू नये आणि शहरात पुन्हा हिंसक घटना घडू नयेत यासाठी सायबर पोलिस सोशल मीडियावरील आक्षेपार्ह आणि भडकावू पोस्टवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तर कोणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट न टाकण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

“किती मर्डर पचवणार हे सरकार?”

अरविंद केजरीवाल पंजाबमधील महिलांना दरमहा देणार 1000 रुपये

पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांचा रिक्षा प्रवास, पाहा व्हिडीओ

एअरटेल वापरताय तर लवकर रिचार्ज करा; ‘या’ तारखेनंतर प्लॅन 501 रूपयांनी महागणार

दिलासादायक! महाराष्ट्रातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या आत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More