पुणे| एक्झिट पोलचे निकाल येण्याच्या अगोदरपासूनच निवडणूक निकालांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातोय. यामध्ये सर्वाधिक बोली मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी लागली आहे.
मावळ आणि शिरुरमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघांसाठी तब्बल 1000 कोटींचा सट्टा लागला असल्याचं बोललं जात आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे श्रीरंग बारणे अशी लढत होणार आहे. या मतदारसंघात सट्टेबाजारात दोन्ही उमेदवारांवर 90 पैशांचा भाव आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव आणि राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे अशी बहुचर्चित लढत पाहायला मिळणार आहे. सट्टेबाजारात आढळरावांना पसंती दिली जात आहे. आढळराव पाटलांना 50 पैसे भाव दिला जातोय, तर अमोल कोल्हे यांच्यावर 1.80 रुपयांचा भाव आहे.
महत्वाच्या बातम्या
-हिंसाचार करु नका; भीम आर्मीच्या इशाऱ्यानंतर प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन
-बारामतीत उद्या चमत्कार घडणारच; कांचन कुल यांना विश्वास
-पक्षाने तुम्हाला काय कमी केलं होतं???….; पुतण्याचा काकाला सवाल
-फक्त प्रकाश आंबेडकरांचा पराभव होऊ द्या; भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही- भीम आर्मी
-…म्हणून जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला; अजित पवारांनी सांगितलं कारण
Comments are closed.