बीडमध्ये मंगलाष्टकांऐवजी वंदे मातरम या गीतावर पार पडला विवाह, धनंजय मुंडे म्हणाले…
बीड | बीड जिल्ह्याच्या पाली येथे आनंदग्राममध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. आनंदग्राम येथे एचआयव्हीग्रस्त मुलांचं पालन-पोषण केलं जातं. येथेच एचआयव्ही झालेल्या कुटुंबातील अनाथ युवक-युवतींचा अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे.
विवाह सोहळ्यात कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, मंगलाष्टकांऐवजी या सोहळ्यात वंदे मातरम् हे गित लावले होते. तसेच वधूवरांनी एकमेकांना हार घालून अगदी साध्या पद्धतीने हा सोहळा संपन्न केला.
“आजपर्यंत मी अनेक सोहळे पाहिले आणि अनेक विवाह सोहळे आयोजित केले पण, या अनोख्या विवाह सोहळ्यात मला उपस्थित राहता आले हे माझे भाग्य आहे”, असं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. या सोहळ्याचे फोटोज् आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांनी शेअर केले आहेत.
आनंदग्रामचे संचालक दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे हे एचआयव्हीबाधित झालेल्या लोकांची सेवा करण्याचं मोठं काम करतात. बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आनंदग्राम या संस्थेला जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 50 लाख रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल असं आश्वासन यावेळी धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.
थोडक्यात बातम्या –
आंतरजातीय लग्नाबद्दल हायकोर्टाने दिला ‘हा’ ऐतिहासिक निकाल!
“संजय राठोडांची अवस्था ‘सामना’मधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी”
‘4 नाही, तर 40 लाख ट्रॅक्टर घेऊन तयार राहा’; राकेश टिकैत आक्रमक
“…तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”
Comments are closed.