बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Coronavirus | दुचाकीस्वार शिंकला अन् महिलेने त्याला चोप दिला, कोल्हापूरमधील प्रकार

कोल्हापूर | कोरोना विषाणूने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचा धसका घेतला आहे.

कोल्हापुरात एकजण दुचाकीवरुन जाताना शिंकल्याने एका दाम्पत्याने दुचाकीस्वाराची धुलाई केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

कोल्हापुरातील गुजरी गल्लीत ही घटना घडली. एक दाम्पत्य दुचाकीवरुन जात असताना अचानक बाजूला असलेला दुचाकीस्वार शिंकला. त्यामुळे रागात दाम्पत्याने दुचाकीस्वाराला मारहाण केली. या घटनेमुळे रस्त्यावर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाने भारतातही शिरकाव केला आहे. त्यासोबत महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

ऊर्जामंत्र्यांची मोफत वीज घोषणा केवळ लोकप्रियतेसाठी?; माहिती अधिकारातून उघड

वसईत कोरोनाच्या नावावर औषध विक्री; 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

महत्वाच्या बातम्या-

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

सॅल्युट… आईची रुग्णालयात मृत्यूशी झुंज; आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची काळजी!

बायकोला न सांगता मैत्रीणीला घेऊन इटलीला फिरायला गेला अन् कोरोना घेऊन परत आला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More