बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकाळी आरोप, संध्याकाळी त्याच्याशीच लग्न; पंकज तडस आणि पूजा यांचा वैदिक पद्धतीनं विवाह

वर्धा | भाजप खासदार रामदास तडस यांची सून पूजा हिचा व्हिडीओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला होता. त्यात तडस यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. तसंच चाकणकर यांच्याकडे मदतीची मागणी केली होती.

पूजा तडस यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तडस यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यानंतर संध्याकाळच्या सुमारास पंकज तडस आणि पूजा यांचा विवाह पार पडला आहे.

सकाळी मी खूप पॅनिक झाले होते. सकाळी माझ्या गाडीसमोरुन कुणीतरी गेलं त्यावेळी मला खूप भीती वाटली होती आणि त्यामुळे आपण ती तक्रार केली होती. आता पंकज यांच्याबद्दल आपली कुठलिही तक्रार नाही असं पूजा यांनी म्हटलंय.

दरम्यान, आपण यापूर्वीही पूजाला स्वीकारलेलं होतं आणि आताही स्वीकारतो आहे. पूजाशी मी लग्न केलं होतं. पण आता त्यांच्या इच्छेनुसार वैदिक पद्धतीनं लग्न केलं आहे. या प्रकरणात काही लोकांनी राजकीय सुपारी घेतली होती तो प्रश्न आता मिटला आहे, असं पंकज तडस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी, त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत विचार करू- चंद्रकांत पाटील

‘…तर मग नारायण राणे महायेडे होते का?’; गुलाबराव पाटलांचा नितेश राणेंना टोला

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

“विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन हातभट्टीचा धंदा टाकावा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More