बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्हॅलेंटाईन-डे दिवशी सुरू झालेल्या प्रेम कहाणीचा झाला अत्यंत दुर्दैवी शेवट!

रायपूर | छत्तीसगढ येथील राजनांदगाव येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. एका प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा शेवट अशाप्रकारे झाला की कोणाच्याही आंगावर काटा येईल. धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याने प्रेमाच्या दिवशी अर्थातच व्हॅलेंटाईन्स-डे दिवशीच लग्न केलं होतं.

संबंधित घटनेतील पतीचं नाव मिनेश वर्मा असं आहे तर पत्नीचं नाव याशिका वर्मा असं आहे. मिनेश आणि याशिकचं व्हॅलेंटाईन्स-डे दिवशी लग्न झालं. मात्र अवघ्या तीन महिन्यांमध्ये त्यांच्या सुखी संसारात किरकोळ कारणांवरुन खटके उडू लागले. शुक्रवारी देखील मिनेश आणि याशिकामध्ये काही कारणांवरुन भांडण झाली.

सततच्या भांडणांना कंटाळून भांडणांनंतर याशिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्याची माहिती पतीला समजताच पतीने दुचाकी काढली आणि वेगाने घरी निघाला. मात्र रस्त्यातच एका बंद ट्रकवर मिनेश पाठीमागून जोरात अदळला. या अपघातात मिनेशचा देखील जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, वर्मा कुटुंबियांना एकाच दिवशी दोघांवर अंत्यसंस्कार करावा लागला. त्यानंतर दोघांच्याही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच एका प्रेम कहाणीचा असा शेवट झाल्याने या घटनेनंतर सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

मन सुन्न करणारी घटना; बहिणीच्या दशक्रियेदिवशीच भावाचाही कोरोनाने मृत्यू

आयपीएलच्या पुनरागमनानंतर राजस्थान राॅयलने शेअर केला भन्नाट व्हिडीओ; पाहा व्हिडीओ

चिंताजनक! कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट सापडला

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं”

भाजपला धक्का! ‘इतक्या’ नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत बांधलं शिवबंधन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More