शुल्लक कारणाने सासरच्यांकडुन छळ; पुण्यात राहत्या घरी गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या
पुणे | काही दिवसांपासुन महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये पुणे शहर अग्रेसर असल्याची बातमी समोर आली होती. हुंडा कमी आणल्यावरुन तर माहेरुन पैसे आणण्याची मागणी करुन अनेक महिलांचा छळ करण्यात येतो. यातूनच अनेक महिला आपलं जीवन संपवतात. अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. सासरी केलेल्या छळाला वैतागून संबंधित महिलेनं टोकाचं पाऊल उचललं असून तिचा छळ करण्यासाठी शुल्लक कारण होतं.
संबंधित महिलेचं नाव शालीनी दिघे (काल्पनिक नाव) असं आहे. शालीनी यांचा छळ गेल्यावर्षीपासून करण्यात येत होता. शालीनी यांच्या पतीचं नाव सागर मोहन कांबळे असं असून दोघे कुटुंबासोबत मार्केटयार्ड येथे राहत होते. या प्रकरणाची माहिती शालीनी यांच्या बहिणीने पोलिसांना दिली असून संबंधित बहिणीने तक्रार देखील नोंदवली आहे.
शालीनी जेवण नीट बनवत नाही तसेच माहेरच्या लोकांशी सतत फोनवर बोलत असते, असं म्हणत तिच्या सासरच्या लोकांनी तिचा प्रचंड छळ केला असल्याचं तक्रारीमधून समोर आलं आहे. एवढंच नाही तर आपल्या आईची काळजी नीट घेत नसल्याचं म्हणत शालीनीचे पती सागर यांनी देखील शालीनीचा प्रचंड छळ केला आहे. यादरम्यान तु एकदाची मरुन का जात नाहीस? म्हणजे मला तुझ्यापासून सुटका मिळेल, असं म्हणत सागर यांनी शालीनी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं.
दरम्यान, सासरच्या तसेच पती सागरच्या जाचाला कंटाळून 25 मे रोजी शालीनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. त्यानंतर शालीनी यांच्या बहिणीने पोलिसांमध्ये सासरची मंडळी आणि पतीच्या विरोधात तक्रार नोंदवली असून पोलीस आता याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
थोडक्यात बातम्या-
प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर घेतला शेवटचा श्वास; ह्रदय पिळवटून टाकणारी घटना!
…..म्हणून लसीकरण प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करु नका
तहानलेल्या गरूडाची तरूणाने अशा पद्धतीने भागवली तहान, पाहा व्हायरल व्हिडीओ
‘उद्धव, मी तुझी शिक्षिका…’; उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटलांना शिकवलेल्या शिक्षिकेची आर्त हाक!
आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; सक्रिय रूग्णसंख्याही घटली
Comments are closed.