बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लोकशाहीच्या मंदिरात मार्शल लाॅ लावलाय’; राज्यसभेतील गदारोळानंतर राऊतांची टीका

नवी दिल्ली | पेगॅससच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी राडा घातला होता. काल राज्यांना आरक्षणाचा अधिकार देणारे विधेयक राज्यसभेत पारित झाले. त्यावेळी राज्यसभेत 6 तास चर्चा झाली आणि अखेर गोंधळाच्या स्थितीत विधेयक मंजुर झाले. त्यानंतर राज्यसभेत साधारण विमा दुरूस्ती विधेयक मांडले गेले. त्यावेळी खासदारांनी पुन्हा राडा सुरू केला.

खासदारांनी गोंधळ घातल्यानंतर राज्यसभेत मार्शलांना बोलवण्यात आलं. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी आणि मार्शलांनी खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. त्यानंतर राज्यसभेत आरोप प्रत्यारोप सुरू झाले. राज्यसभेत झालेल्या या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. त्यानंतर खासदारांनी सभापतींच्या आसनाजवळ जाऊन कागदपत्रे उधळली.

राज्यसभेत गदारोळानंतर विरोध पक्षातील खासदारांनी गंभीर आरोप केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीच्या मंदिरात मार्शल लाॅ लावला असल्याचा आरोप केला आहे. तर ही संसदीय लोकशाही आहे का?, असा सवाल देखील संजय राऊतांनी विचारला. तर राज्यसभेतून बाहेर येताना मार्शलांनी महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.

दरम्यान, माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत महिला खासदारांवर हल्ला झाल्याचं पाहिलं नाही. 40 हून अधिक खासदारांना सभागृहातून बाहेर काढण्यात आलं. हा लोकशाहीवर हल्ला आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

अनाथ मुलांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

भाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस- सुप्रिया सुळेेेंचा भाजपवर निशाणा

दिलासादायक! येत्या चार ते पाच दिवसात होणार पावसाचं दमदार आगमन, हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More