Top News कोल्हापूर

शेवटची ओवाळणी! शहीद ऋषिकेश जोंधळेंना बहिणीने ओवाळलं

कोल्हापूर | आज भाऊबीज असून सर्व ठिकाणी दिवाळीचा उत्साह सुरू आहे. मात्र भाऊ बहिणीच्या नात्याच्या मोठ्या उत्सवाच्या दिवशी कोल्हापूरमध्ये बहिणीने तिच्या भावाला शेवटचं ओवाळलंय.

शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचं पार्थिव बहिरेवाडी या त्यांच्या मूळ गावी दाखल झालं. शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आलं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

फुलांचा वर्षाव करत नागरिकांनी जोंधळे यांच्या पार्थिवाला वंदन केलंय. आज भाऊबीजेच्या दिवशी ऋषिकेश जोंधळे यांची बहीण कल्याणी हिने त्यांना अखेरचं ओवाळलं आहे.

पाकिस्तानने 13 नोव्हेंबरला शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारतावर गोळीबार केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या या गोळीबाराला भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, या गोळीबारात महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला.

महत्वाच्या बातम्या-

विराट कोहली अनुष्काचा कुत्रा; काँग्रेस प्रवक्त्याकडून उल्लेख!

“मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार, मात्र नियंत्रणाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल”

पुणे पुन्हा हादरलं, ‘या’ संघटनेच्या प्रमुखाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या

धक्कादायक! बीडमध्ये तरूणीवर अॅसिड हल्ला; हल्ल्यानंतर जिवंत जाळलं

मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नव्हती; नितीश कुमारांचा मोठा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या