कोल्हापूर | पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे. संग्राम पाटील याचं पार्थिव कोल्हापुरातील निगवे खालसा गावात दाखल झाले आहे.
जम्मू काश्मीरमधील राजोरी भागात 16 मराठा पोस्टवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात निगवे खालसा येथील संग्राम पाटील यांना वीरमरण आलं. यानंतर दोन दिवसांनी त्यांचे पार्थिव मूळगावी दाखल झालं आहे.
गावातील चनिशेटी विद्यालयासमोरील क्रीडांगणावर लष्करी इतमामात जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. निगवे खालसा गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या-
गोव्यात समविचारी पक्षाची युतीची तयारी- प्रफुल्ल पटेल
“महामारीचे बाप बनून लोकांच्या जिवाशी का खेळता?”
आम्हाला चंपा, टरबुजा बोललेलं कसं चालतं?- चंद्रकांत पाटील
शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू
“देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेवर टीका करण्याशिवाय पर्याय नाही”