Top News उस्मानाबाद देश

उस्मानाबाद जिल्ह्यातील जवान सागर तोडकरी पठाणकोटमध्ये शहीद!

Photo credit- twitter/ anil deshmukh

उस्मानाबाद | परांडा तालुक्यातील सोनारी गावचे जवान सागर तोडकरी यांना पठाणकोटमध्ये वीरमरण आलं आहे. सोमवारी कर्तव्य बजावत असताना ते शहिद झाले. त्यांच्या या अकाळी मृत्युमुळे तोडकरी कुंटुबावर आणि सोनारी गावात शोककळा पसरली आहे. ते पंजाब इथे भारतीय सैन्यदलात नाईक पदावर कार्यरत होते.

सागर तोडकरी यांचा अंत्यविधी सोनारी गावात होणार आहे. त्यांचं पार्थिव मंगळवारी सकाळी 11 वाजता पुणे विमानतळावर आणण्यात येईल. पार्थिव गावी पोहोचल्यावर रात्री लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सागर तोडकरी हे 2010 मध्ये सैन्यदलात सामिल झाले होते. सध्या ते पंजाब इथे ब्रिगेड ऑफ गार्ड, 15 गार्ड पठाणकोट दलात कार्यरत होते. याच दरम्यान त्यांनी नागपूर इथून सैन्यदलाचे प्रशिक्षण पुर्ण केलं. 2015 मध्ये त्याचा विवाह झाला होता. 4 वर्षांचा मुलगा आणि 2 वर्षांची मुलगी अशी दोन लहान लहान मुलं आहेत. त्यांच्या या मृत्युमुळे आई-वडील आणि पत्नीवर मोठं संकट आलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील सोनारी गावचे सुपुत्र मेजर सागर तोडकरी यांना पठाणकोट येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.

थोडक्यात बातम्या-

गुंड गजानन मारणेची तुरुंगातून सुटका, 500 गाड्या स्वागताला; पाहा 5 व्हायरल व्हिडीओ-

आयपीएलच्या लिलावाआधी मोठी घोषणा, ‘या’ सघानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय!

रस्ते वाहतूक मंत्रालयाची मोठी घोषणा, ‘त्या’ वाहनचालकांना आता थेट मिळणार वाहन परवाना!

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम् योजना’; नेमकी काय आहे ही योजना???

जा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांकडून मंत्रिपदाचा राजीनामा?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या