बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात कोळीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध; कोळ्याच्या प्रजातींना शहीद तुकाराम ओंबळेंचं नाव

मुंबई | नेचरलिस्ट ध्रुव प्रजापतीने महाराष्ट्रात कोळ्याच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. ध्रुव प्रजापतीने त्याच्या ट्विटर हँडलवरून उडी मारणार्‍या कोळीच्या प्रजातीचे फोटो शेअर केले आहेत. फोटोसह ध्रुवने कोळीच्या दोन नवीन प्रजातींची ओळख करून दिलीये.

26/11 च्या हल्ल्यात दहशतवादी कसाबला पकडून ठेवणारे पोलीस शहीद तुकाराम ओंबळे यांचं नाव या दोन कोळ्याच्या प्रजातींना देण्यात आलं आहे. दोन कोळ्यांचं शास्त्रीय नामकरण Icius tukarami असं करण्यात आलं आहे. दुसरी प्रजाती मित्र कमलेश चोळके यांच्या स्मरणार्थ आहे. जिला Phintella cholkei असं नाव देण्यात आलं आहे.

या कोळ्यांच्या प्रजातींना 26/11 च्या मुंबई हल्ल्यात छातीवर 23 गोळ्या झेलून दहशतवादी अजमल कसाबला पकडून देणाऱ्या शहीद ओंबळे यांना समर्पित करण्यात आलं आहे, अशी माहिती ध्रुव प्रजापतीनी दिली आहे.

दरम्यान, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडलं. यावेळी तुकाराम ओंबळे हे शहीद झाले. तुकाराम ओंबळे यांनी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडल्यामुळेच पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत”

आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

‘तुझ्या दिसण्यामुळं तुझं अभिनेत्री होणं कठीण’, ‘या’ अभिनेत्रीनं मुलीला दिला होता सल्ला

“वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो”; भरसभेत वडेट्टीवारांचा शिवसेनेवर घणाघात

“…तर प्रीतम मुंडे खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवतायत हे सिद्ध होईल”

नागरिकांनो सावधान! आज देखील महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More