Maruti Cars Discount Offers | सगळ्यांनाच नेहमी वाटतं असतं की, आपल्याकडेही एखादी छानशी फोर व्हीलर असावी. मात्र, बजेटमुळे हे स्वप्न अपूर्णच राहुन जातं. मात्र, आता तुम्हाला कार घेण्यासाठी जास्त विचार करावा लागणार नाहीये. कारण, Maruti Suzuki त्यांच्या काही कार्सवर तगडं डिस्काऊंट देत आहे. त्यामुळे स्वस्तात कार खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे.
या महिन्यात मारुती सुजुकीच्या काही मॉडेल्सवर डिस्काऊंट (Maruti Cars Discount Offers ) दिलं जाणार आहे. आता या चार कार्स नेमक्या कोणत्या आणि त्यांच्यावर किती लाखांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे, याबाबत या लेखात सविस्तर महिती दिली आहे.
‘या’ गाड्यांवर 2.5 लाख रुपयापर्यंत Discount
Maruti Suzuki Grand Vitara : या गाडीवर तब्बल 55 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट दिलं जातंय. याचबरोबर 3 हजार रुपयापर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट सुद्धा मिळतोय. या कारची (Maruti Cars Discount Offers ) किंमत 10,99,000 रुपये (एक्स-शोरूम) ते 19,93,000 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
Maruti Suzuki Jimny : मारुतीच्या या कार वर सर्वाधिक म्हणजेच तब्बल 1 लाख ते 2.5 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतंय. पण या डिस्काऊंटचा फायदा फक्त मारुती सुजुकी स्मार्ट फायनान्स साठी आहे. या कारची किंमत 12,74,000 रुपये (एक्स-शोरूम) ते 14,79,000 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.
Maruti Suzuki Baleno : मारुती सुजुकीच्या प्रसिद्ध कारच्या AMT वेरिएंट्सवर 45 हजार रुपयापर्यंत, मॅनुअल वेरिएंटवर 40 हजार पर्यंत आणि CNG वेरिएंटवर 20 हजार रुपयापर्यंत (Maruti Cars Discount Offers ) डिस्काऊंट मिळतंय. या कारची किंमत 6,66,000 रुपये (एक्स-शोरूम) ते 9,83,000 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
सदर डिस्काऊंट हे वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे असू शकते. त्यामुळे खरेदीदारांनी याच्या ऑफर्स बदद्ल जाणून घेण्यासाठी जवळच्या डीलरशी संपर्क साधावा.
News Title : Maruti Cars Discount Offers
महत्त्वाच्या बातम्या-
“..तर राज्यात तिसरी आघाडी निश्चित”; बच्चू कडू यांचे महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत
“मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी”, शेतकरी नेत्याची सरकारवर टीका
“पत्नीचा गळा आवळून खून केला, नंतर इलेक्ट्रिक शॉकने..”; धक्कादायक प्रकारामुळे पुणे हादरलं
एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा! केंद्राने केली मोठी घोषणा
भाजपला आणखी एक मोठा झटका; माजी आमदार तुतारी हाती घेणार?