तंत्रज्ञान

मारुती-सुझुकीची नवी बलेनो ग्राहकांच्या भेटीला; पाहा काय आहे किंमत…

मुंबई | मारुती सुझुकी कंपनीने ग्राहकांसाठी ‘बलेनो’ कारचं नविन फेसलिफ्ट वर्जन आज लाँच केलं आहे. 5.45 लाख ते 8.77 लाख एवढी या कारची किंमत आहे. या नव्या फेसलिफ्ट कारमध्ये आतून बाहेरुन काही नविन फिचर्स देण्यात आले आहेत.

नवी बलेनो बोल्ड ही स्टायलिश डिझाइन आणि प्रिमियम इंटेरियरसह येईल. या कारमध्ये स्पीड अलर्ट सिस्टीम, को-ड्रायवर सीट बेल्ट रिमाइंडरही देण्यात आले आहे.

या कारमध्ये रिअर पार्किंग सेंसर्सदेखील देण्यात आले आहेत, याशिवाय या कारमध्ये ड्युअल एअर बॅग्स आणि चाइल्ड सेफ्टी सीटही आहे.

दरम्यान, 2016 पासून बलेनो भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. विशेष बाब म्हणजे ग्राहकांना ही कार केवळ 11 हजार रुपयांमध्ये बुकींग करता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“माझं हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या, मात्र…”

-संतप्त शेतकऱ्यांनी कचरा पेटवला; पुण्यात शेतकऱ्यांचा हल्लाबोल 

राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

-हिटमॅन रोहित शर्माने केली एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

-श्रीगोंद्यात भाजपला बहुमत, मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या