बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?, केंद्राने राज्यांना दिल्या ‘या’ सूचना

मुंबई | देशात कोरोनाचा (Corona Virus) प्रादुर्भाव आटोक्यात आला असं वाटत असतानाच राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाची वाढती आकडेवारी बघता मास्कसक्ती (Mask) परतण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील सक्रिय कोरोना रूग्णांची (Active Corona Patients) संख्या दोन हजारांच्या जवळ पोहोचली आहे. त्यात मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या देखील वाढत असल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. त्यात केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र पाठवत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

देशात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) आणि सोबतच मास्कची देखील सक्ती राहावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्र पाठवत महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना दिल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात 1 एप्रिल रोजी मास्कसक्ती हटवण्यात आली होती. मात्र, मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्कसक्ती परतण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीतील वाढती रूग्णसंख्या बघता केंद्र सरकारने सतर्कतेची पावलं उचलायला सुरूवात केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज ठाकरेंना फुले, शाहू, आंबेडकरांची अॅलर्जी आहे का?”

प्रशांत किशोर यांचा फाॅर्म्युला ठरला! महाविकास आघाडीबाबत काँग्रेस हायकमांडला दिला ‘हा’ सल्ला

‘राज ठाकरेंचं समर्थन भाजपला महागात पडेल’; केंद्रीय मंत्र्याचा भाजपला सल्ला

मुख्यमंत्री राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार; ‘या’ नेत्यांची नावे वगळली

…अन् भर मंडपात नवरीने नवऱ्याच्या कानशिलात लगावली; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More