बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना पुन्हा वाढतोय! देशातील ‘या’ राज्यात मास्कसक्ती पुन्हा लागू

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्व नागरिकांचं आयुष्य कोरोना या एकाच नावाभोवती फिरताना पहायला मिळालं आहे. कोरोना गेला आणि परत आला अशीच सध्या सर्वांची अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहून मास्कबंदी उठवण्यात आली होती. पण आता काही राज्यात परत एकदा मास्क अनिवार्य झाला आहे.

गेल्या दोन दिवसात देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्याचं लक्षात आल्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश सरकारनं मास्क घालणं सक्तीचं केलं आहे. दिल्ली सरकारनं तर सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांना 500 रूपये दंड भरण्याचा आदेश पारित केला आहे.

दिल्लीत मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. परिणामी लहान मुलांच्या लसीकरणावर अधिक प्रमाणात भर देण्यात येत आहे. 15 ते 59 वयोगटातील नागरिकांना सरकार बुस्टर डोस देणार आहे. अनेक राज्य सरकार आपापल्या कार्यक्षेत्रात निर्बंध लादण्याचा विचार करत आहेत. अशात ठाकरे सरकार काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, चीन आणि युरोपियन देशांमध्ये  काही प्रमाणात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रूग्ण आढळल्यानं नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. अशात विमान प्रवासावरील नियम कठोर करण्याचा विचार देखील काही देश करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

“आमच्याशी पंगा घेऊ नका, खूप महागात पडेल”; राऊत विरोधकांवर बरसले

“मौका सभी को मिलता है”; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या लेकींची कमाल; अंशू आणि राधिकानं रौप्यपदक पटकावलं

पालकांनो सावधान! लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

“बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर…”; शरद पवारांनी कान टोचले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More