Top News क्राईम नागपूर महाराष्ट्र

लग्नाआधीच्या प्रेयसीसोबतची ऑडिओ क्लीप पत्नीने ऐकली अन् मग….

photo credit- Pixabay

नागपूर | नागपूरात अवघ्या सव्वा महिन्यापूर्वी एक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. पण लग्नापूर्वीच्या प्रेमप्रकरणाची ऑडिओ रेकॉर्डिंग पत्नीने ऐकल्यामुळे त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. या वादातूनच पतीने आपल्या पत्नीला संपवलं आहे.

नागपुरातील एमआयडीसी भीमनगर भागात ही घटना घडली. हत्या झालेल्या नवविवाहतेचे नाव दीप्ती नागमोती आहे. तर आरोपी पतीचे नाव अरविंद नागमोती आहे. घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी अरविंद नागमोती घटनास्थळावरुन फरार झाला आहे. दरम्यान पोलिस आरोपी अरविंद नागमोतीचा शोध घेत आहेत.

वादातून पती अरविंदने पत्नी दीप्तीची शनिवारी उशीने नाक-तोंड दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. दीप्तीने पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती माहेरच्या मंडळींना दिली होती. रविवारी दीप्तीचे कुटुंबीय घरी आल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला.

दरम्यान, आरोपी अरविंद नागमोतीच्या लग्नाआधिच्या प्रेयसीसोबतच्या प्रेमप्रकरणाची ऑडिओ रेकॉर्डिंग पत्नीने ऐकली होती त्यातून त्याने तिची हत्या केली. दीप्तीच्या माहेरच्यांनी याविषयाची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलीस या हत्याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘या’ बॅंकांमध्ये तुमची खाती तर नाहीत ना?; ‘या’ चार बँकेचं होतयं खाजगीकरण

मुंबईतील नायर रुग्णालयात 26 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येनं खळबळ!

विराट कोहलीला मोठा धक्का; होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई

गुंडांना टोलमाफी, फटाके वाजवून जल्लोष… गृहराज्यमंत्री अ‌ॅक्शन मोडमध्ये!

पूजा चव्हाण प्रकरणात ऑडिओ क्लीप कशा लीक झाल्या?; समोर आली धक्कादायक माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या