मुंबई| कोरोनाचा प्रादुर्भाव देशात तसंच राज्यात वाढतच चालला आहे. मुंबईमध्ये कोरोनामुळं पहिला बळी गेला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडूलकरनं देशातील जनतेला आवाहन केलं आहे. सचिननं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात धुतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हात फक्त पाण्यानेच नाही तर हाताला साबण लावून हात धुतले पाहिजेत आणि कोरड्या टॉवेलने हात स्वच्छ करणं गरजेचं आहे. असं आवाहन सचिननं या व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला केलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून स्वच्छता पाळण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याचबरोबर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. विविध प्रसारमाध्यमातून लोकांंना जागृत केलं जात आहे.
दरम्यान, आज पुण्यात एका महिलेला कोरोना लागण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 19वर गेल्याचं समजत आहे. तर राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 42इतकी झाली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!
“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे
महत्वाच्या बातम्या-
यांच्या डोक्यावर सॅनिटायझर टाका नाहीतर…- संबित पात्रा
अमिताभ बच्चनही आयसोलेशनमध्ये, हातावर BMCचा ‘शिक्का’
कोरोनामुळे पुण्यात PMPML बसच्या 584 फेऱ्या रद्द
Comments are closed.