बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाला…

मुंबई | महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने अनेक विक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक झळकावणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. जगभरातील बॉलर्सची झोप उडवणाऱ्या सचिनला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 10 ते 12 वर्ष नीट झोप लागत नव्हती. स्वत: सचिननेचं या खळबळजनक गोष्टीचा गौप्यस्फोट केला आहे.

कोरोनाच्या काळात क्रिकेटपटूंना जास्त वेळ हा बायो-बबलमध्ये घालवावा लागत आहे. या बंधनामुळे खेळाडूंच्या मनस्थितीवर होणाऱ्या परिणामाबद्दल एका कार्यक्रमात बोलताना सचिनने हा गौप्यस्फोट केला. एखाद्या मॅचसाठी शारीरिक तयारी करण्याबरोबर मानसिक तयारी करणे देखील तितकंच आवश्यक आहे. हे मला काही काळानंतर समजले. मैदानात प्रवेश करण्यापूर्वीच माझ्या डोक्यात मॅच सुरु होत असे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या तणावाची तीव्रता ही खूप जास्त होती, असं तो यावेळी म्हणाला.

सचिनने सांगितलं की, मी 10-12 वर्ष हा तणाव सहन केला. मॅचपूर्वी कित्येक रात्र नीट झोपू शकलो नाही. त्यानंतर मी या गोष्टी मान्य करण्यास सुरुवात केली. माझी मनस्थिती नीट राहावी म्हणून मी काही वेगळ्या गोष्टी करु लागलो. यामध्ये टीव्ही पाहणे, व्हिडीओ गेम्स खेळणे तसेच सकाळी चहा बनवणे या गोष्टींचा समावेश होता.या कामांमुळे मला मॅचसाठी तयार होण्यास मदत मिळत होती, असं देखील त्याने सांगितलं.

दरम्यान , सचिनने यावेळी चेन्नईतील एका हॉटेल कर्मचाऱ्याचा उल्लेख केला. माझ्या खोलीत एक कर्मचारी डोसा घेऊन आला होता. त्यानं डोसा टेबलवर ठेवल्यानंतर मला एक सल्ला दिला. मला एल्बोमुळे बॅटचा वापर नीट करता येत नाही, असं त्याने सांगितलं, जे खरं होतं. त्यानंतर मला त्या समस्येवरील उपाय शोधण्यास मदत झाली, असं सचिनने सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

आयकर अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर बलात्कार; व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

“अजित पवारांनी कोवॅक्सिन लस निर्मितीचा प्रकल्प राजकीय वजन वापरून पुण्याला पळवला”

कोविशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आरोग्य मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना ‘या’ नव्या आजाराचा धोका, नागपूरमध्ये रुग्ण वाढले

जोर लगाके हैशा! लोकं बघत राहिली पण युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More