बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बच्चू कडूंचा गनिमी कावा! वेशांतर करुन शासकीय कार्यालयात गेले अन्…

अकोला | पालकमंत्री बच्चू कडू नेहमीच आपल्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत असतात. ते नेहमीच आपल्या कामाला प्राधान्य देतात. आज बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांचं काम पाहण्यासाठी एक गनिमी कावाच रचला होता, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी आज अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना वेशांतर करून भेट दिली होती.

बच्चू कडू यांनी युसुफखाँ हे बनावट नाव धारण करून वेशांतर केले. यानंतर त्यांनी अकोला महानगरपालिकेला भेट दिली. तिथे त्यांनी विविध विभागांची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधला. मात्र, एकही मनपा कर्मचारी कडू यांना ओळखू शकला नाही.

बच्चू कडू मनपामध्ये गेल्यानंतर मनपा आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात नव्हत्या. यामुळे कडू यांनी स्वीय सहाय्यकाशी संवाद साधला. स्वीय सहायक देखील कडू यांना ओळखू शकले नाहीत. मनपाचा कारभार पाहिल्यानंतर बच्चू कडू तेथून निघून गेले. मात्र, ते निघून गेल्यानंतर पालकमंत्री वेशांतर करून आले होते, हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबळ उडाली.

महानगरपालिकेला भेट दिल्यानंतर बच्चू कडू पातूर शहरात गेले. कडू यांनी पातूर शहरात देखील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांना भेटी देत शासकीय कार्यालयाचा धांडोळा घेतला. तसेच शहरातील स्वस्त धान्य दुकानांना देखील कडू यांनी भेटी देत कारभार पाहिला.

थोडक्यात बातम्या – 

मराठा आंदोलनावर खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा, म्हणाले….

“महाराष्ट्र सरकारने पळवाट न काढता निदान 15 दिवस तरी अधिवेशन बोलवावं”

सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये, बोलावली महत्वाची बैठक; ‘या’ गोष्टींवर होणार चर्चा?

अखेर प्रतिक्षा संपली! ‘बिग बाॅस मराठी 3’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘झाडे लावा आणि जास्त मार्क मिळवा’, ‘या’ ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरु केली अनोखी योजना

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More