Top News

मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी उर रहमान लख्वीला 15 वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली | मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी उर रहमान लख्वीला पाकिस्तानातील पाकिस्तानातील न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा सुनावलीये. लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शुक्रवारी शिक्षा ठोठावलीये.

टेरर फंडिंगप्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयाने लख्वीला ही शिक्षा सुनावलीये. काही दिवसांपूर्वीच लख्वीला अटक करण्यात आली होती.

लाहोरमध्ये लख्वीविरोधात टेरर फंडिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका दवाखान्याच्या नावावर तो पैसे उकळत होता. शिवाय या पैश्यांचा वापर तो दहशतवादी कामांसाठी वापरत होता.

लख्वी हा 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी जकी उर रहमान लख्वीला दहशतवादी घोषित केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान”

नाद करा पण जडेजाचा कुठं! आपल्या रॉकेट थ्रोने शतकवीर स्मिथला दाखवला तंबुचा मार्ग; पाहा व्हिडीओ

कांगारूंच्या धर्तीवर रोहित शर्माचं नाणं खणखणलंच; ‘हा’ विक्रम केला नावावर

“माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील असं मला वाटतं नाही”

“मला धक्के देण्याची सवय, कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या