बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन ‘कॅप्टन कुल’ मध्ये रंगणार सामना; ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

मुंबई | आयपीएल हंगामातील 8वा सामना चेन्नई सुपर किंग आणि पंजाब किंग्जमध्ये खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडेवर हा सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग आपला पहिला विजय नोंदवण्याचा संघाचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे पंजाब किंग्जच्या गोलंदाजांसाठी आज मोठी परिक्षा असणार आहे.

कर्णधार केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ मैदानात उतरेल. चेन्नई समोर पंजाबचं ख्रिस गेल नावाचं वादळ उभं राहू शकतं. तर केएल राहुल देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तर दुसरीकडे दिपक हुडा चांगलाच रंगात आल्यानं पंजाबच्या मिडल ऑर्डरची समस्या सुटली आहे. पण पंजाबला गोलंदाजांची चिंता लागून राहिली आहे. मोहम्मद शमी वगळता कोणत्याही गोलंदाजाला पहिल्या सामन्यात चमक दाखवत आली नाही.

तर दुसरीकडे चेन्नईचा संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. दिल्ली विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. सुरेश रैनाचं दमदार कमबॅक झाल्यानं चेन्नईच्या संघानं सुटकेचा श्वास घेतला आहे. तर येत्या सामन्यात ऋतुराज गायकवाड ऐवजी अनुभवी रॉबिन उत्तप्पाला संघात स्थान दिली जाऊ शकते. त्याचबरोबर अंबाती रायडु, रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावो यांना चांगली कामगिरी करावी लागेल. त्याचबरोबर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडून देखील मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

दरम्यान, वानखेडेच्या मैदानावर लाल आणि पिवळ्या मातीच्या खेळपट्टीवर सामना होणार आहे. त्यामुळे जलदगतीच्या गोलंदाजांना याचा फायदा चेंडू स्विंग करण्यास मिळू शकतो. त्यामुळं या सामन्यात मोठी धावसंख्या होईल की, मागील दोन सामन्याप्रमाणे गोलंदाजांचा दबदबा राहिल हे पाहावं लागेल.

थोडक्यात बातम्या-

‘ताईसाहेब, राजकारण इतरत्र जरूर करा, पण…’; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर

“अजित पवार सर्जन आहेत”; पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचे पुन्हा भाष्य

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी मुकेश अंबानी आले धावून; उचललं हे मोठं पाऊल!

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार असेल- नाना पटोले

कुणाचा पगार वाढला, कुणाचा कमी?; वाचा भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारा नवा पगार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More