बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजस्थानपुढे महेंद्रसिंह धोनीच्या बलाढ्य चेन्नईला रोखण्याचं आव्हान, कोण मारणार बाजी?

 मुंबई | आयपीएल हंगामातील 12 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. मागील सामना जिंकल्यानं आजच्या सामन्यात दोन्ही संघ आत्मविश्वासाने उतरतील.

चेन्नई सुपर किंग्सने मागील सामन्यात पंजाब किंग्जला 6 धावांनी पराभूत केल होतं. या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केलेल्या दीपक चहरवर सर्वांच्या नजरा असतील. तर सुरेश रैनाची संघात एन्ट्री झाल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजीला धार आली आहे. तर संघात आता लुंगी एनगिडीला घेतलं जाऊ शकतं. त्याचं नुकतंच आयपीएलसाठी भारतात आगमन झालं होतं. तर दुसरीकडे संघाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या फॉर्ममध्ये नसल्यानं त्याच्या जागी रॉबिनला संधी देण्यात येऊ शकते.

तर दुसरीकडे दिल्लीला हरवून आपला पहिला विजय मिळवणाऱ्या राजस्थानला चेन्नई विरुद्ध आक्रमकपणे खेळण्याची गरज आहे. डिव्हिड मिलरला संघात स्थान दिलं गेलं आणि त्याने संधीचं सोनं करत पहिला विजय मिळवून दिला होता. तर बटलरवर देखील सर्वांच्या नजरा जडल्या आहेत. आतापर्यंत मुंबईच्या मैदानात पॉवर प्लेमध्ये 16 पैकी 15 विकेट फास्टर गोलंदाजांनी घेतल्या आहेत.त्यामुळे जयदेव उनाटकटने चेन्नईच्या फलंदाजांची कंबर तोडणं राजस्थानसाठी फायद्याचं ठरेल.

दरम्यान, राजस्थानचा सलामीचा फलंदाज मनन वोहरा सध्या खराब फॉर्म मध्ये असल्यानं त्याच्या जागी युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याला संधी मिळू शकते. मुंबईच्या वानखेडेवर ड्यु इफेक्ट पाहायला मिळत आहे. त्यांमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला या सामन्यात मैदानावरील खेळपट्टीचा जास्त फायदा मिळेल.

थोडक्यात बातम्या-

पुणे जिल्हा परिषदेची दर्यादिली; एक दिवसाचा पगार देऊन कोरोनासाठी उभा केले ‘इतके’ कोटी

गुढीपाडव्याला घेतला होता नवाकोरा ट्रॅक्टर, बाप-लेकासाठी तोच ठरला काळ!

देवाने प्रत्येक घरात सलमानसारखा मुलगा जन्माला घालावा- राखी सावंत

“गृहमंत्री बदलूनही हफ्ते वसुली चालू असेल तर आता पर्याय काय काढणार?”

शिक्षकानं विद्यार्थिनीला दाखवला अश्लील व्हिडीओ, अत्यंत धक्कादायक प्रकारानंतर खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More