बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फायनलच्या पराभवाचा बदला घेण्यास दिल्ली तयार, कोण जिंकणार आजचा सामना??

चेन्नई | आयपीएल हंगामातील 13वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडियम वर हा सामना खेळवला जाईल. मागील वर्षी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवून पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी वर कब्जा मिळवला होता. या पराभवाचा बदल घेण्यासाठी दिल्लीचा संघ आज मैदानात उतरेल. तर दुसरीकडे आणखी एका सामना  विजयासाठी मुंबईची पलटन तयार असेल.

मुंबईचा संघ या वर्षी सर्वात बलाढ्य संघ मानला जात आहे. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघाने सध्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. मुंबईने मागील सामना जिंकल्याने या सामन्यात संघ सकारात्मक दृष्टिकोनातून उतरेल. सुर्यकुमार यादव आणि ईशान किशन या दोघांना अद्याप मोठी पारी खेळता आली नाही. मुंबईचे गोलंदाज मात्र चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. हार्दिक पांड्या सध्या दुखापत ग्रस्त असल्याने तो पुढील सामन्यात मुकण्याची शक्यता आहे. परंतु संघाकडून अद्याप कोणतीही घोषणा झाली नाही.

तर दुसरीकडे युवा कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ चांगली कामगिरी करत आहे. तर सलामीवीर शिखर धवन आक्रमक पवित्रा घेत संघाला चांगली सुरवात करून देत आहे. तर दिल्लीने स्टीव्हन स्मिथला संघात जागा दिली आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ आणखीन मजबुत झाला आहे. मागील सामन्यात मार्कस स्टाॅनिसने फटकेबाजी करत सामना जिंकून दिला होता. सुरवातीचे 3 सामने झाले तरी दिल्लीच्या गोलंदाजांना खेळपट्टी पकडता आली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांना विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल.

दरम्यान, आतापर्यंत झालेल्या 28 सामन्यात 16 वेळा मुंबईने बाजी मारली आहे तर 12 वेळा दिल्लीचा संघ जिंकला आहे. चेन्नईच्या मैदानावर मागील काही सामन्यात कमी स्कोर झालेला दिसत आहे. त्यामुळे या सामन्यात टॉस जिंकेल त्याच पारडं जड राहणार आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुळे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड

मंत्री राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक खुलासा; “रेमडेसिवीरचा साठा महाराष्ट्राला मिळणार होता पण…”

“बात निकली है तो दूर तक जायेगी”; रोहिणी खडसेंना भाजप नेत्याचा इशारा

खुनाचा बदला खुनानेच घेण्याचा प्रयत्न, पुण्यातील थरारक घटनेनं परिसरात खळबळ

18 वर्षावरील व्यक्तींना लस घेण्यासाठी काय काय करावं लागेल?; जाणून घ्या संपुर्ण माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More