बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ‘या’ आक्रमक खेळाडूकडे दिली कर्णधारपदाची धुरा; विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठा बदल!

मुंबई | ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने विकेटकिपर मॅथ्यू वेड याची कर्णधारपदी निवड केली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित कर्णधार अॅरॉन फिंचला जखम झाली होती. त्याच्या डाव्या पायाचा घोटा दुखू लागल्याने तो वेस्ट इंडीज दौरा अर्धवट सोडून गेला होता.

त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला नविन कर्णधाराची गरज होती. वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या मालिकेमध्ये कर्णधार पदाची धूरा अॅलेक्स कॅरीकडे सोपवण्यात आली होती. ती मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी खिशात घालली होती. परंतु आता कॅरी बांग्लादेश दौऱ्यात मथ्यू वेडच्या नेतृत्त्वात खेळताना दिसेल.

डेव्हिड वार्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा जर ऑस्ट्रेलिया संघात समावेश केला तर कॅरीचा अंतिम अकरामध्ये स्थान मिळतं की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. बांग्लादेशविरूध्द होण्या-या टी-20 मालिका ही ढाका येथिल शेर ए बांगला स्टेडियमवर 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात येणार आहेत.

दरम्यान, टी-20 विश्वचषकाचं आयोजन युएईमध्ये 17 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर करण्यात आलेलं आहे. त्यापूर्वी ऑस्टेलियाचा नियमित कर्णधार अरॉन फिंच फिट होईल, अशी माहिती क्रिकेट ऑस्टेलियाने दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

नारायण राणेंनी सेना सोडली तेव्हा संजय राऊत बाथरूममध्ये लपले होते- नितेश राणे

एकीकडे ठाकरे-फडणवीसांची भेट, तर दुसरीकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

‘एक आई म्हणून तुम्हाला विनंती करते…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा झाली व्यक्त!

बाबो! ‘या’ माजी मंत्र्याने केली तब्बल 6 लग्न, पत्नीनेच केला गुन्हा दाखल!

उत्तर प्रदेशमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला फक्त विकास दिसेल- अमित शहा

…याच जिल्ह्यातील दुकानांच्या वेळेत वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More