महाराष्ट्र मुंबई

मटका किंग मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याची त्याच्याच ऑफिससमोर गोळ्या घालून हत्या

मुंबई | कल्याणच्या स्टेशन परीसरात नीलम गल्लीत मटका किंग उर्फ मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला.

महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी जिग्नेशला फोर्टीज रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. नंतर फोर्टीज रुग्णालयात डॉक्टराने जिग्नेशला मृत घोषित केलं.

जिग्नेशची हत्या करणारे आरोपी धर्मेश उर्फ नन्नू नितीन शहा व जयपाल उर्फ जापान यांच्यासह अन्य दोन जणानी केली आहे. हे चारही आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे. तपास कामाकरीता पाच तपास पथके तैनात करण्यात आली आहे.

जिग्नेश ठक्कर याचे कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे परिसरात अनेक ठिकाणी मटका आणि रम्मी क्लब असून तो क्रिकेट मॅचवरदेखील सट्टा लावत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेदरम्यान जिग्नेश हा कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. आपल्या ऑफिसमधून घरी जाण्यासाठी रात्री जिग्नेश कार्यालयाच्या बाहेर आला. त्याचवेळी घात लावून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जिग्नेश ठक्करवर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

 महत्वाच्या बातम्या-

‘साहेब झोपूनच असायचे रिया मॅडम मात्र…’ सुशांतच्या बाॅडिगार्डचे धक्कादायक खुलासे

आत्महत्येच्या रात्री नक्की काय घडलं?; सुशांतच्या मित्राने केला खुलासा

‘सुशांत संशयास्पद औषधं घेत होता’, जीम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा

“राजू शेट्टीचा आता काजू शेट्टी झालाय; शेतकऱ्यानं सोडलेला रेडा दिसेल त्या पिकात तोंड घालतोय”

सध्या महाविकास आघाडी सरकारची अवस्था ‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडं’- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या