बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समीर वानखेडे यांचा निकाह लावून देणारे मौलाना आले समोर; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे

नवी दिल्ली | आर्यन खान प्रकरणापासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यातील चांगलाच वाद पेटला आहे. नवाब मलिक वानखेडेंवर एका मागून एक आरोप लावतच आहेत. त्यातच समीर वानखेडेंनी खोट्या कागदपत्राच्या आधारे नोकरी मिळवली असा आरोप मलिकांनी केला होता. त्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे.

समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप नबाव मलिकांना केला होता. त्यावर त्यांनी अनेक पुरावेही सादर केले होते. आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट केला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांचं आणि त्यांची पहिली पत्नी डॉ.शबाना कुरेशी यांचा निकाह लावणारे मौलाना समोर आले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर एकच खळबळ माजली आहे.

मौलाना मुज्जमिल अहमद असं या मौलानाचं नाव आहे. मुज्जमिल अहम्मद यांनी नवाब मलिकांनी सादर केलेला निकाहनामा खरा असल्याचं म्हटलं आहे. शिवाय समीर आणि शबाना दोघेही मुस्लिमच आहेत. जर त्यातील एकही जण मुस्लिम नसता तर त्यांचा निकाह लावला नसता. असा धक्कादायक खुलासा मुज्जमिल अहमद यांनी केला आहे.

याशिवाय निकाहनाम्यावर मीच सही केली होती, असं सांगत मुज्जमिल पुढे म्हणाले, समीर आणि त्यांचे वडील हे दोघंही मुस्लिम आहेत. निकाहनाम्यावर दावूद नाव असल्यानेच हा निकाह होऊ शकला. असा दावा मुज्जमिल यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपला मोठा धक्का! भाजपचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

यंदाच्या दिवाळीत अमृता फडणवीस चाहत्यांना देणार सुरेल दिवाळी गिफ्ट

अन् राहुल गांधीनी भर बैठकीत विचारलं इथे कोण कोण दारू पितं?

धाकधुक पुन्हा वाढली! देशातील कोरोनाबाधितांच्या मृत्युसंख्येत वाढ, पाहा आकडेवारी

‘तो’ दाढीवाला ड्रग्ज माफिया वानखेडेंचा मित्र? पत्रकार परिषदेत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More