लखनऊ | झी न्यूज हिंदुस्थान वाहिनीवर लाईव्ह कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये हाणामारीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मौलवी एजाज अरशद कासमी आणि महिला वकिल फराह फैज यांच्यात ही मारहाण झाली आहे.
तीन तलाक हा चर्चेचा विषय होता. चर्चा तीव्र झाल्यावर एजाज अरशद कासमी आणि फराह फैज दोघे आक्रमक झाले. पहिल्यांदा फैज यांनी अरशद कासमी यांच्या कानशीलात दिली. त्यावर अरशद यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी फैज यांना मारहाण केली.
दरम्यान, चॅनलच्या स्टुडिओ स्टाफने मध्यस्थी केली. नोएडा पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कार्यक्रम संपताच एजाज अरशद कासमी यांना ताब्यात घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप
-भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर
-दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!
-सांगलीत पोलिसाला 18 वेळा भोसकलं, घटना सीसीटीव्हीत कैद
-दूध दरवाढीवरुन नगरच्या शेतकऱ्यानं महादेव जानकरांना शिव्या दिल्या!
Comments are closed.