Top News देश मनोरंजन

मशिदीत माईक बंद करायला विसरला मौलवी, ‘त्या’ आवाजानं गाव रात्रभर त्रस्त! पहा व्हिडीओ

Photo Credit - Facebook/ @lakembamosqueofficia

नवी दिल्ली | सोशल मीडियावर कधी काय व्हायरल कोणी काही सांगू शकत नाही. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओबद्दल असा दावा केला जात आहे की एक मौलवी मशिदीचे माइक बंद करायला विसरले होते, त्यानंतर रात्रभर लोकांना आवाज येत राहिले.

या मौलवींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आलं आहे. लोक मीम्स करुन त्याचा आनंद घेत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे ऐकू येत आहे की, मौलवी बिनधास्तपणे झोपले आहेत आणि त्यांच्या घोरण्याचा आवाज येत आहे.

एक ट्विटर यूजर @dapakiguy92 याने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘मौलवी साहेब माइक बंद न करता झोपले’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

ही बातमी ट्वीट होईपर्यंत 48 हजाराहून अधिक लोकांनी पाहिली आहे. 900 हून अधिक जणांनी रीट्वीट केली आहे. 2800 हून अधिक लोकांना लाइक केली आहे. लोक मौलवींच्या या व्हिडिओबद्दल मजेदार मीम्स शेअर करीत आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे ते अद्याप कळू शकलं नाही.

थोडक्यात बातम्या –

“आज महाराज असते तर धनंजय मुंडे, मेहबूब शेख, संजय राठोड यांचा कडेलोट केला असता”

15 कोटी म्हणजे किती रे भाऊ?, स्वतःवर लागलेली बोलू ऐकून त्याला पडला प्रश्न!

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ अजब वक्तव्याचा नवाब मलिकांकडून समाचार, म्हणाले…

पूजा राठोड प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती, चुलत भावाला वनखात्यात चिटकवलं?

‘या’ भाजप नेत्याची एसआयटी चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या