Maval Lok Sabha l आज लोकसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरु आहे. या निकालाकडे देशातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. अशातच महाराष्ट्रातील मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान झाले आहे. एकूण 52.90 टक्के लोकांनी त्यांच्या मताधिकाराचा वापर केला आहे. यावेळी येथे मुख्य लढत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये झाली आहे. शिवसेनेने मावळते खासदार श्रीरंग बारणे, तर संजोग वाघेरे पाटील हे शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गटाकडून) उभे राहिले होते.
मावळमध्ये श्रीरंग बारणे आघाडीवर :
या निवडणुकी दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. अशातच आता मतमोजणीच्या पहिल्या फेरीत शिवसेनेचे संजोग वाघेरे पाटील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीवर आहेत. तर दुपारच्या १ वाजल्याचा अपडेट्सनुसार शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहेत.
श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहेत. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पिछाडीवर टाकलं आहे. त्यामुळे आता या निकालाकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागलं आहे.
Maval Lok Sabha l शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत :
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने या जागेवरून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्या विरोधात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिली होती. सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा एनडीएमध्ये समावेश केला आहे. या जागेवरून शिवसेनेने पुन्हा श्रीरंग बारणे यांच्यावर विश्वास टाकला आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (ठाकरे गट) संजोग वाघेरे पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. संजोग हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक राहिले असून यापूर्वी त्यांनी औद्योगिक नगरीचे महापौरपद भूषवले आहे.
News Title- Maval Lok Sabha Loksabha Result Updates
महत्वाच्या बातम्या-
अजित पवारांना मोठा धक्का, बारामतीही हातातून जाणार?
लोकसभा निकालाच्या भीतीने शेअर मार्केटमध्ये मोठे बदल; पुढे काय होणार?
महायुतीमधील दिग्गज उमेदवारांना धक्का; नारायण राणे, पंकजा मुंडे, सुनेत्रा पवारसह उदयनराजे पिछाडीवर
साताऱ्यात शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले; कोण आघाडीवर? जाणून घ्या अपडेट
राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचं निकालाबाबत मोठं भाकीत!