सुनील शेळकेंचा गेम होणार?, मावळ पॅटर्नला मनसेचा पाठिंबा

Maval Vidhansabha

Maval Vidhansabha l विधानसभा निवडणुकीत अनेक मोठ्या घडामोडी होत आहेत. अशातच आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मुंबईतील बोरीवली विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न देखील केले आहेत. तसेच सर्वात चर्चेत असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण शिवसेना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांची देखील अर्ज मागे घेण्याची मनधरणी केला जात आहे.

शेळकेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ :

अशातच आता पुण्यातील मावळ पॅटर्नला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता पॅटर्न सत्यात उतरवण्यासाठी भाजपचे नेते बाळा भेगडेंनी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंच्या पराभवासाठी बाळा भेगडे थेट मैदानात उतरले आहेत.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटासह सर्वपक्षीयांनी बापू भेगडेंना देखील पाठिंबा दर्शवला आहे. अशातच आता बाळा भेगडेंनी देखील राज ठाकरेंची भेट घेत, मनसेच्या पाठिंब्यावर अखेर शिक्कामोर्तब केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळं आता अजित पवारांच्या सुनील शेळकेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

Maval Vidhansabha l शरद पवारांनी देखील डाव टाकला :

बापू भेगडेंना मावळ भाजपने पाठिंबा जाहीर देखील केला आहे. मात्र आता सुनील शेळकेंच्या पराभवासाठी शरद पवारांनी देखील डाव टाकला आहे. कारण महाविकास आघाडीच्या जागावाटपात मावळची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला होती. त्या कारणामुळेच बंडखोर बापू भेगडेंनी आता शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

सर्वात विशेष म्हणजे शरद पवार यांनी देखील या मागणीला संमती देत पाठिंबा देऊ केला आहे. त्यामुळे आता सुनिल शेळकेंच्या चांगल्याच अडचणी वाढल्या असल्याच्या दिसून येत आहेत.

News Title – Maval Vidhansabha 2024

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा!

मविआच्या मागणीला यश, अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं

मनोज जरांगेंच्या निर्णयावर लक्ष्मण हाकेंची खरपूस प्रतिक्रिया; म्हणाले…

HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस बंद राहणार!

जरांगेंनी माघार घेण्याचं कारण सांगितलं; म्हणाले, “उमेदवार पडला तर जातीचं हसू..”

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .