बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मॅक्सवेलचा धमाका! बंगळुरूचा राजस्थानवर 7 गडी राखून दणदणीत विजय

मुंबई | राजस्थान राॅयल्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या आयपीएलचा 43 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात बंगळुरूने राजस्थानवर दणदणीत विजय मिळवला आहे. बंगळुरूच्या टाॅप ऑर्डर फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत 17 चेंडू राखत हा विजय बंगळुरूच्या पारड्यात टाकला. यात ग्लेन मॅक्सवेलची फलंदाजी सर्वांत आकर्षक राहिली.

सर्वप्रथम बंगळुरूने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राजस्थानचा फलंदाज ईवन लुईसने सुरूवातीपासून विराट कोहलीची चिंता वाढवली. त्यांने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. तर दुसरीकडे यशस्वी जस्वालने देखील त्याला चांगली साथ दिली. 11 षटकात राजस्थाने तब्बल 100 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर राजस्थानची फलंदाजी ढासळली. एकाही फलंदाजाला अखेर मोठी खेळी करता आली नाही.

राजस्थानने बंगळुरूसमोर 150 धावांचं आव्हान ठेवलं. त्याला प्रत्युत्तर देत कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पेडीक्कलने बंगळुरूला मजबूत सुरूवात दिली. सुरूवातीच्या 5 षटकात बंगळुरूने 48 धावा केल्या होत्या. देवदत्त बाद झाल्यानंतर आलेल्या भरतने देखील विराट कोहलीला मोलाची साथ दिली. कोहली बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत बंगळुरूला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आणि ए बी डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलने सामन्याचा शेवट केला.

दरम्यान हा सामना बंगळुरूने 17 चेंडू आणि 7 गडी राखून जिंकला आहे. या विजयासोबतच बंगळुरू गुणतालिकेत 3ऱ्या स्थानी कायम राहिला आहे. तर दुसरीकडे राजस्थानची स्पर्धेतील आव्हान संपूष्टात येण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

मुुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

तालिबान्यांची ISIS विरोधात मोहीम! अफगाणिस्तानमधून इस्लामिक स्टेटची हकालपट्टी करणार

प्राचार्यांसमोर विद्यार्थ्याचा राडा; घटनेचा व्हिडीओ CCTVमध्ये कैद

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर! अहमदनगरचा वैभव दिघे राज्यात प्रथम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More