Top News

इंदुरीकर महाराज बाळासाहेब थोरातांविरोधात लढणार असल्याच्या जोरदार चर्चा

अहमदनगर |  संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना उतरवण्याचा भाजपने मोठा डाव असल्याचं कळतंय. त्यातच इंदुरीकर महाराजांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेत हजेरी लावल्यानं एकच चर्चा सुरु झालीय.

संगमनेरमध्ये शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा होती. यावेळी भाजपच्या मंचावर इंदुरीकर महाराजांनी हजेरी लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. आणि थोरातांविरूद्ध इंदुरीकर महाराज लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

भाजपने इंदुरीकर महाराजांना विधानसभेच्या उमेदवारीची ऑफर दिल्याचं समजतं आहे. जर थोरातांविरूद्ध इंदुरीकर उभे ठाकले तर राज्याच्या लक्षवेधी लढतीपैंकी संगमनेरची लढत असेल.

जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनीही ती स्विकारली तर किर्तनाचा मंच सोडून राजकीय व्यासपीठावरून त्यांची सेकंड इनिंग सुरू होईल. दरम्यान इंदुरीकर महाराज यांनी याबद्दल प्रतिक्रिया कळू शकलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या