बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माया इथंच संपत नाही! सुपेंकडे पुन्हा सापडलं ‘इतक्या’ लाखांचं घबाड

पुणे | टीईटी परिक्षेत (TET Exam) म्हणजेच शिक्षक पात्रता परिक्षेत पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. अशातच आता याप्रकरणी तुकाराम सुपेंच्या (tukaram Supe) अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

पेपरफुटीप्रकरणात पुणे पोलिसांना तुकाराम सुपेच्या घरात 2 कोटी रुपये आणि मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याची माहिती समोर आली होती. अशात आता तुकाराम सुपेंकडून आज आणखी 33 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे. त्यामुळे आता सुपेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे. तुकाराम सुपेंवर कारवाई करण्यात आल्यावर तपासात त्यांनी लपवलेले सगळे पैसे हळूहळू समोर येत आहे.

दरम्यान, हे पैसे त्याच्या वेगवेगळ्या नातेवाईकांच्या घरी दडवून ठेवले होते. मात्र आता पोलिसांच्या चौकशीतून ते हळूहळू बाहेर येत आहेत. टीईटी गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुपे व सावरीकर यांच्यासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! ‘या’ भागात 2 वर्षाच्या चिमुकल्याला Omicronची लागण

‘लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…’;

‘मांजर आडवं गेले तरी…’; नितेश राणेंच्या म्याव म्याववर शिवसेनेचं टीकास्त्र

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

धक्कादायक! Omicronपासून वाचण्यासाठी आता एका व्यक्तीला मिळणार ‘इतके’ डोस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More