बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बुमराहला शुभेच्छा देणं मयंक अग्रवालला पडलं महागात, वाचा नेमकं काय झालं…

मुंबई | टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सोमवारी स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत लग्न केलं. यानंतर टीम इंडियाच्या सगळ्याच खेळाडूंनी दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा दिल्या, पण या दोघांचं अभिनंदन करताना मयंक अग्रवालने मात्र, मोठी चूक केली. बुमराहला शुभेच्छा देणारं ट्विट करताना मयंकने संजना गणेशनला टॅग करण्याऐवजी संजय बांगरला टॅग केलं.

मयंक अग्रवालला जेव्हा त्याची चूक लक्षात आली तेव्हा त्याने आपलं ट्वीट डिलीट केलं, पण चाहत्यांनी मात्र त्याच्या या ट्वीटचा स्क्रीनशॉट घेतला आणि मयंकला ट्रोल करायला सुरूवात केली. ‘अभिनंदन जसप्रीत बुमराह आणि संजय बांगर, तुमचं आयुष्य आनंदी आणि आरोग्यदायी राहो,’ असं मयंक अग्रवाल त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला होता.

जसप्रीत बुमराहने गोव्यामध्ये स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत लग्न केलं, यानंतर कर्णधार विराट कोहली, केएल राहुल यांच्यासह अनेक खेळाडूंनी दोघांना शुभेच्छा दिल्या. बुमराहनेही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लग्नाची बातमी दिली. प्रेमाने प्रेरित होऊन, आम्ही दोघांनी नव्या प्रवासाला सुरूवात केली आहे. आज आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस आहे, असं बुमराह त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला.

दरम्यान, लग्नानिमित्त बुमराहने सुट्टी घेतली होती, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये तो खेळला नव्हता, तसंच टी-20 सीरिजमध्येही त्याला आराम दिला गेला आहे. तीन मॅचच्या वनडे सीरिजमध्येही त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. बुमराहच्या गैरहजेरीतही टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने दोन्ही टी-20 मॅचमध्ये चांगली गोलदाजी केली.

 

थोडक्यात बातम्या –

पेस्टकंट्रोल करणं कुटुंबाला पडलं महागात; पालशेतकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर!

‘शाकाहारी’ महिलेला चुकून ‘मांसाहारी’ पिझ्झा डिलिव्हर करणं पडलं महागात!

सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार; राजस्थानमधील घटनेनं देश हादरला!

…अन् 15 कोरोना रूग्णांनी मिळेल त्या वाहनांनी घरी धूम ठोकली!

झोमॅटो डिलिव्हरी बाॅयवर आरोप करणाऱ्या हितेशा चंद्राणी विरोधात गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More