बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Mayank Agarwal ची बॅट तळपली! शतक ठोकत उडवला किवीं गोलंदाजांचा धुव्वा

मुंबई | भारत-न्यूझीलंडदरम्यान (IndVsNz) सध्या कसोटी मालिका (Test Searies) चालू आहे. कसोटी चॅम्पियनशीपचा (Test Championship) गतविजेता न्यूझीलंड (Newzealand) आणि गतउपविजेता भारत (India) कसोटी प्रकारातील दोन दिग्गज संघ मानले जातात. दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीनं (Ind Captain Virat Kohali) फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ ऐकवेळ अडचणीत सापडला होता. पण सलामीवीर मयंक अग्रवालच्या (Mayank Agrawal) शतकानं कमाल केली.

नाणेफेक जिंकून भारतीय संघानं दमदार सुरूवात केली होती. पण न्यूझीलंडला फिरकीपटू एजाज पटेलच्या अप्रतिम गोलंदाजमुळं भारतीय फलंदाजी ढेपाळली. एकवेळ 80-0 बाद असणाऱ्या भारतानं 15 चेंडूमध्ये 3 गडी गमावले. भारताची अवस्था 80-3 अशी झाली होती. पण मयंक अग्रवाल एकाबाजूनं खिंड लढवत होता.

मयंकनं अगोदर श्रेयसच्या बरोबरीनं नंतर रिद्धिमान साहाच्या साथीनं भारताच्या डावाला आकार दिला. परिणामी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत 221-4 अशा स्थितीत होता. मयंक अग्रवाल गेल्या एका वर्षापासून दहा डावात एकही शतक झळकावू शकला नव्हता. त्याच्या धावांचा दुष्काळ अखेर आज संपला. आज खेळ संपला तेव्हा मयंक 120 धावांवर नाबाद होता.

दरम्यान, पहिल्या दिवसाच्या खेळात पंचांच्या एका निर्णयामुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीला पंचानी एलबीडब्लू बाद दिलं पण स्क्रिनवर तो नाबाद असल्याचं स्पष्ट दिसत आहे. परिणामी पंचांच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसला आहे.

थोडक्यात बातम्या 

देवेंद्र फडणवीसांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती, स्वत:च केला खुलासा

विराट कोहली Out की Not Out?, अंपायरच्या निर्णयानंतर वाद पेटला; पाहा व्हिडीओ

बिबट्या थेट वर्गात शिरला अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

अबब… लाखाचे केले 72 लाख!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

परमबीर सिंहांनी पुन्हा ठाकरे सरकारविरोधात दंड थोपटले, हे मोठं पाऊल उचलणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More