मायावतींचं आखिलेश यादवांवर शरसंधान; ‘आखिलेशसोबत जाणं ही माझी सर्वात मोठी चूक’

मायावतींचं आखिलेश यादवांवर शरसंधान; ‘आखिलेशसोबत जाणं ही माझी सर्वात मोठी चूक’

लखनऊ | लोकसभेला समाजवादी पार्टीसोबत जाणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती, असा खळबळजनक दावा बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

समाजवादी पक्षाने त्यांच्या प्रचारात आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळे दलित आणि मागासवर्गियांची मते मिळाली नाही, असं मायावती म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता त्यावेळीही मायावतींनी आखिलेश यादवांवर पराभवाचं खापर फोडलं होतं. यादवांचीच मते आम्हाला मिळाली नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याकरिता सपा-बसपा एकत्र आले होते. मात्र काही काळानंतरच त्यांनी आता वेगळी चूल मांडणे पसंत केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, छगन सदन लूट; भाजपचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

-काँग्रेसने विखेंची जागा दिली ‘या’ नेत्याला; विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

-‘त्या’ वादग्रस्त ट्वीटवरुन राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

-विधानसभेसाठी आमचा कॅप्टन ठरलाय; सदाभाऊ खोतांचा उद्धव ठाकरेंना टोला

-हर्षवर्धन पाटलांच्या कन्येची राजकारणात दमदार एन्ट्री

Google+ Linkedin