Top News राजकारण

काँग्रेसच्या राजस्थानमध्ये कायद्याचं नव्हे तर जंगलराज सुरू- मायावती

उत्तर प्रदेश | बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. राजस्थानातील पुजाऱ्याला जाळण्यात आलेल्या घटनेवरून मायावती यांनी निशाणा साधलाय.

मायावती ट्विट करत म्हणाल्या, उत्तर प्रदेश प्रमाणेच राजस्थानमध्ये काँग्रेसच्या राज्यात सर्वप्रकारचे गुन्हे वाढले आहेत. अर्थातच तिथे देखील कायद्याचं नाही तर जंगलराज सुरूये.

राजस्थानमध्ये काँग्रेस नेते सरकारवर निशाणा साधण्याऐवजी गप्प बसलेत. याचा अर्थ उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ज्या पिडीतांची यांनी भेट घेतली, ते केवळ मतासाठीचे राजकारण होतं, बाकी काहीच नाही, असा टोलाही मायावती यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

…तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही- रोहित पवार

सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत- चंद्रकांत पाटील

हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती

मेट्रोची कारशेड आरेत नव्हे कांजूरमार्गला होणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या