मनोरंजन

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला इशारा, म्हणाल्या…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सुशांतच्या वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. यानंतर बुधवारी बिहारमधून चार पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं होते. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे. यानंतर आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे.

 

मायावती यांनी ट्विट करत ही मागणी केलीये. त्या म्हणाल्या की, मूळचा बिहारचा तरुण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी समोर येतायत. त्याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनंतर या प्रकरणाचं गूढ आणखीन वाढलं आहे. आता या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र किंवा बिहार पोलिसांकडून होण्याऐवजी सीबाआयद्वारे होणं योग्य आहे.

सुशांत राजपूत प्रकरणात महाराष्ट्र आणि बिहारच्या काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे असं दिसून येतंय की त्यांचा खरा हेतूने या प्रकरणाच्या माध्यमातून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने गंभीरता दाखवावी, असं देखील मायवती यांनी सांगितलंय

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

नागपुरात हृदयद्रावक घटना; कोरोनाग्रस्त मातेचा मृत्यू, बाळ मात्र सुरक्षित

सलमान आणि संजय दत्तचे वकील लढणार रियाची केस; एका दिवसाची फी ऐकून धक्का बसेल..

“महाराष्ट्रात खंजीर खुपसण्यासाठी कोण ओळखले जातात याचा आधी शोध घ्या”

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना होतोय ‘हा’ आजार; वेळीच व्हा सावध

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर माजी केंद्रिय मंत्री जयराम नरेश यांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या