बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून किशोरी पेडणेकरांचा यु टर्न; म्हणाल्या…

मुंबई | देशात कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचाही अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. अशातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मंगळवारी भाष्य केलं होतं. परंतु आज त्यांनी ते वक्तव्य मागे घेतलं आहे. त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

माझं घर माझा बाप्पा, माझं मंडळ,  माझा बाप्पा ही संकल्पना करत पेडणेकर यांनी मी घर सोडून कुठेच जाणार नाही, तसेच कोरोनाची तिसरी लाट येणार आहे, असं नाही. आली आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य  मंगळवारी केलं होतं. त्यानंतर ते वक्तव्य मागे  घेत पेडणेकर म्हणाल्या की,  मी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आली आहे, असं म्हटलं नव्हतं. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले होते, की नागपुरात तिसरी लाट आली आहे. त्यामुळे तिसरी लाट आपल्या दारावर आली असून खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं देखील किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

नितीन राऊत यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या कार्यालयाने एक परिपत्रक काढून पेडणेकर यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तिसरी लाट मुंबईच्या वेशीवर असून पहिल्या दोन लाटांचा अनुभव पाहता, ते थांबवणे आपल्या हातात आहे, असं पेडणेकर यांना म्हणायचं होतं.

दरम्यान, मुंबईत रूग्णसंख्या कमी अधिक प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने गेल्या आठवड्यात सुचना केल्या आहेत. एका इमारतीमध्ये जर पाच पेक्षा कोरोना रूग्ण आढळून आल्यास ती इमारत महापालिकेकडून सील केली जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

राऊतांच्या 2 अपेक्षा, भाजपचे 5 प्रश्न; राऊत-भाजप वाकयुद्ध रंगलं!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सहा पिकांच्या MSPमध्ये वाढ

धक्कादायक! तालिबान्यांच्या भीतीने देश सोडून गेलेल्या नागरिकांना ‘या’ शेजारी राष्ट्राने हाकललं

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने, संपुर्ण महाराष्ट्रांचं लक्ष!

“राज्यात मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री भ्रष्टाचारी, काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More