बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…हे म्हणजे मयताच्या कपाळावरचं लोणी खाण्याचं काम आहे”

मुंबई | ज्यांना कुणाला राज्य सरकारने मृतांची आकडेवारी लपवलं असं वाटत असेल त्यांनी सिद्ध करुन दाखवावं. हे मयताच्या कपाळावरचं लोणी खाण्याचं काम आहे, असा घणाघात मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केलाय.

मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का दडवण्यात आले? इतके अक्षम्य दुर्लक्ष का? आणि असं करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार?, असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेत. यालाच पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलंय.

मी तूर डाळीचा घोटाळा ऐकला होता, पण कोरोना मृतांचा घोटाळा पहिल्यांदाच ऐकत आहे. खरंतर मृत बॉडी लपून राहूच शकत नाही. ती तातडीने डिस्पोज करावी लागते, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

कोरोना हा गंभीर आजार आहे. यादरम्यान राजकारण करु नका. महाराष्ट्रात सध्या खालच्या पातळीवरील राजकारण सुरु आहे. या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खरे की खोटे? हे जनता ठरवेल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर करा, आधी पेशंटचा खाटांचं बघा”

“सुशांतनं 7 फिल्म साईन केल्या होत्या, 6 महिन्यात सर्व काढून घेण्यात आल्या”

महत्वाच्या बातम्या-

“खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधींसारखे मॅनेजर दिल्लीत बसले आहेत”

एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडे सुशांतच्या वडिलांच्या भेटीला; पोलिसांकडून अंकिताचीही चौकशी

भारत-चीनच्या सैन्यात चकमक; भारताच्या एका कर्नलसह दोन जवान शहीद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More