महाराष्ट्र मुंबई

‘भाजपची भूमिका डबल ढोलकी’; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं भाजपला प्रत्युत्तर

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुनावणीदरम्यान महापालिकेने वकिलांना सुमारे 82 लाख 50 हजार रुपये फी दिली आहे. यावरून भाजपने टीका केली होती. या टीकेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पैसे खर्च केले नसते तर मग ती जे आरोप करतेय ते मान्य करायला लागले असते. भाजपला डबल ढोलकी वाजवायला आवडते वाटतं. ज्या कंगणानं महाराष्ट्र, मुंबईला वेठीस धरुन पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तिला त्यांनी पाठीशी घातले. हे  भाजपचे फक्त प्रश्न विचारणारे राहिले असल्याचं म्हणत पेडणेकरांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

याच प्रकरणावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवर टीका करत त्यांच्यावरही निशाणा साधला.

दरम्यान, पेंग्विन आणि कंगणा राणातच्या प्रकरणातील वकीलासाठी मुंबईकर कर भरतात. आणखी काय शिल्लक आहे?, असा सवाल करत आता असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे’; मराठा आरक्षणावरून पाटलांचा गौप्यस्फोट

‘दसरा मेळाव्यात भारताचा अपमान केला’; उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

“दुखापतग्रस्त मयांकची टीममध्ये निवड, मग रोहित शर्माची का नाही?”

‘राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने…’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना चिमटा

“आता यांच्या मुलांची लग्न देखील आपल्याच पैशातून होतील असं वाटतंय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या