बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतल्या शाळा सुरु होणार का?, महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या…

मुंबई | मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यत आलं असता येत्या दोन दिवसात आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

शाळा सुरु करण्यास राज्य शासनानं परवानगी दिल्यानंतर शाळा सुरू करण्यात येईल. कोरोनाच्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. दोन दिवसात आम्ही याबाबतचा आढावा घेऊन त्याबाबतचा पुढील निर्णय घेऊ. हा आढावा घेताना गणपती नंतर झालेल्या चाचण्यानंतर काय रिझल्ट आला तेही पाहिलं जाईल, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

मुंबईत कोरोना रेट कमी झाला आहे. सध्या पॉझिटीव्हिटी रेट 0.06 टक्के आहे. 100 पैकी एक ते दोन जणांचे कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. तसेच, 15% रुग्ण बेडवरच आहेत. तसेच 85% बेड रिक्त आहेत, अशी माहितीही पेडणेकरांनी दिली.

दरम्यान, राज्यातील शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात ४ तारखेपासून शाळा प्रत्यक्ष सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील कोविड संक्रमण स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

UPSC Result | लातूरच्या नितीशाचा देशात डंका; 21व्या वर्षीच UPSC परीक्षेत यशाला गवसणी

UPSC मध्ये पहिल्या आलेल्या शुभमला नरेंद्र मोदींचा अमेरिकेतून फोन!

“…या प्रकरणी BJP च्या सर्व ताई, माई अक्का तोंडाला कुलूप लावून बसल्या”

UPSC Result | आई-वडिलांच्या कष्टाचं पोरीनं चीज केलं; शेतकऱ्याची लेक बनली IAS

पुण्यातील ‘या’ भागाला मोठा दिलासा, बहुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजन संपन्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More