बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना भवन आमचं श्रद्धास्थान, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार”

मुंबई | अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदी घोटाळ्याच्या आरोपावरून शिवसेना आणि भाजप आक्रमक झाले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून शिवसेनेन भाजपवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेल्या टीकेच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला होता. मुंबई भाजप युवा मोर्चा शिवसेना भवनवर दाखल झाले होते. याची माहिती मिळताच शिवसैनिकही दाखल झाले. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

या राड्यानंर दोन्ही पक्षांमध्ये टीका सुरू झाली आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोेरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला खरंच माहिती नाहीये नेमकं काय झालं आहे?, शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी डिवचण्याचा कुणी प्रयत्न करणार असतील तर त्या पद्धतीने शिवसैनिक प्रत्युत्तर देणार असं किशोेरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

सत्तेत आहोत नक्कीच याची जबाबदारी आहे. पण उगाचच काही करणार असेल कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार, असं म्हणत पेडणेकरांनी भाजपलाच इशारा दिला आहे. पेडणेकरांच्या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधान परिषदेचे पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी, दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करतेय, ते दुर्दैवी आहे. सत्तेचं कवच घेऊन अशाप्रकारच्या या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाल्या नाहीत, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

दैव देतं पण कर्म नेतं! राणू मंडलला उद्धपटणा पडला महागात, आता अशा प्रकारे जगते जीवन

मोदींना खोटं बोलण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळायला हवा- दिग्विजय सिंह

वाह रे पठ्ठ्या! ‘या’ मराठमोळ्या मुलाने इन्स्टाग्रामवरील ती कमी दाखवली अन् कंपनीने दिले 22 लाख रुपये

ब्रेकींग! शिवसेना भवनासमोर आंदोलनात भाजप-सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने

भाच्याची गाडी अडवल्याने महिला आमदारने लगावली पोलिसाच्या कानशिलात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More